माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले निलंबित

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): माण तालुक्यातील बेकायदा वाळू उपसाप्रकरणी तहसीलदार सुर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

माण तालुक्यात चोरून वाळूचा बेसुमार उपसा केला जात होता. त्याबाबत वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या जात होत्या. मात्र, आमच्या भागात कोणतीही बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूक होत नसल्याचे माणच्या महसूल विभागाकडून सांगितले जात होते.
तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माण तालुक्यातील शिरताव गावच्या हद्दीतील ओढ्यातून हजारो ब्रास वाळू चोरून नेल्यानंतर उपसरपंच किरण शामराव खळवे यांनी तहसीलदार येवले यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी एकाही अनधिकृत खडी क्रशर अथवा वाळू चोरीविरोधात कारवाई केलेली नाही.

परिविक्षाधीन अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उगारला परिविक्षाधीन अधिकारी रिचर्ड यानथन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर माण तालुक्यातील अनाधिकृत खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई करून ते सील केले होते. तसेच वाळू चोरांनाही हिसका दाखवला. त्यामुळे तहसीलदार येवले यांचा कामचुकारपणा समोर आला. तसेच तहसीलदारांनी अवैध वाळू उपसा आणि अनाधिकृत क्रशरकडे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली.

व्हिडिओ-ऑडिओ क्लिपमुळे पाच तलाठ्यांचे निलंबन एका कारवाईवेळची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तलाठ्यांचे निलंबन केले होते. तत्पूर्वी प्रातांधिकारी आणि तहसीलदार येवले या दोघांनाही कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना थेट निलंबित करण्यात आल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!