सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बंगळुरु महामार्गावर वाढे फाटा या ठिकाणी एक भंयकर घटना घडली आहे. या रस्त्यावर केमिकलने भरलेला पिकअप टेम्पो उलटला. मिळालेल्या माहितीनुसार या पिकअप टेम्पोमध्ये पिवळ्या रंगाच्या केमिकलच्या बॉटल्स होत्या. या बॉट्लस फुटल्यामुळे त्यातील केमिकल हवेत पसरले. ज्यामुळे अनेकांना उलटीचा त्रास झाला. तसेच काही लोकांच्या डोळ्यांना त्रास जाणवला.
पुणे-बंगळुरु महामार्गावर सातारा एमआडीसीकडे एक पिकअप टॅम्पो जात होता. या पिकअपमध्ये पिवळ्या रंगाचे केमिकल होते. अनेकजण हे अॅसिड असावे असा अंदाज बांधत आहेत. रस्त्यावरुन जात असताना चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले. परिणामी हा पिकअप रस्त्यावरच उलटला. यावेळी या पिकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या केमिकलच्या बॉटल्स फुटल्या आणि त्यातून पिवळ्या रंगाचा धूर बाहेर निघू लागला. काही वेळानंतर हा धूर महामार्गावर पसरला. धूर पसरल्यामुळे रस्त्यावरील इतर प्रवाशांच्या डोळ्यांना त्रास जाणावू लागला. काही महिला प्रवाशांना तर रस्त्यावरच उलटी झाली.
दरम्यान, हा प्रकार समोर येताच बाकीच्या प्रवाशांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाने पिकअपमधून निघत असलेल्या धुरावर नियंत्रण मिळवले. पिकअप रस्त्यावरच उलटल्यामुळे येथे काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.