महाबळेश्वरात दवबिंदूचे हिमकण

महाबळेश्वरमधील स्ट्राॅबेरीच्या रोपांवर हिमकाण जमा झाले आहेत

महाबेश्वर (भूमीशिल्प वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे नंदनवन असलेले थंड हवेचे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर मध्ये  गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनास शहरात दाखल झालेले पर्यटक या गुलाबी थंडीची मजा लुटत असून प्रसिद्ध वेण्णालेक व लिंगमळा परिसरामध्ये दवबिंदूंचे हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळाले. या हंगामातील हिमकण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सध्या महाबळेश्वरनगरी नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटनासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहेत. शहरातील तापमानामध्ये सतत चढ उतार होत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या कडाक्याच्या थंडीमुळे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक परिसरासह लिंगमळा परिसरामध्ये मंगळवारी पुन्हा एकदा दवबिंदूंचे हिमकणामध्ये रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळाले.

वेण्णालेक नौकाविहाराच्या लोखंडी जेटी सह लिंगमळा परिसरातील उभ्या असलेल्या वाहनांच्या टपांवर,घरांवरील छपरांवर,झाडाझुडपांसह पानांवर देखील अनेक ठिकाणी हिमकण जमा झाल्याचे पहाटे पाहावयास मिळाले. या भागातील दुचाकीच्या सीट,स्ट्रॉबेरीच्या रोपांवर  वर तसेच झाडाझुडपांमध्ये हिरवळीवर हिमकणांचा गालिचा पसरल्याचे चित्र होते हिमकण होण्याची ही पहिलीच वेळ असून स्थानिकांसह पर्यटक या बदलणाऱ्या वातावरणाचा आनंद घेतला दिसत असून मुख्या बाजारपेठेत देखील उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी  दिसत आहे.

error: Content is protected !!