मृत्युपश्चात दोघांसह दहा जण पॉझिटिव्ह


सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :  सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरानाबाधित आले आहेत.यामध्ये खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघांचा मृत्युपश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुष (मृत) आणि सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला,खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटल, सातारा येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता.खटाव तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष व  विसापूर येथील   71 व 62 वर्षीय पुरुष,जावली तालुक्यातील काळोशी येथील 39 वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील 28 व 26  पुरुष व 50 वर्षीय महिला यांचा  समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 331 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी 317 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर 28 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.उर्वरित 286 जणांवर नियमानुसार विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एनसीसीएस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 181 जणं निगेटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.













error: Content is protected !!