सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई तालुक्यातील केंजळ येथील युवकांनी शुक्रवारी रात्री महापुरुषाचा पुतळा केंजळ ग्रामपंचायतीच्या आवारात बसवला. हा पुतळा बसविण्यासाठी येथील युवकांनी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने पुतळा काढण्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळा बसवावा. तोपर्यंत पुतळा हटविण्यावर प्रशासन ठाम असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले, तर पुतळा हटविण्यास युवकांचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांना सांगितले. हा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवणार नसल्याचे येथील युवावर्ग व ग्रामस्थांनी प्रशासनास सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
ग्रामस्थांनी संबंधित पुतळा हटवण्यासाठी केलेल्या विरोधामुळे येथे दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात यावेळी वादावादी झाली.
You must be logged in to post a comment.