सातारा-पुणे महामार्गावरील टोलच्या दरांत वाढ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावर प्रवास करताना वाहन धारकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिलपासून टोलच्या दरात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच कार सारख्या लहान वाहनांसाठी १५ ते ८५ रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात आला आहेत. तर मोठ्या आणि अवजड वाहनांसाठी ७० रुपये टोल वाढवण्यात आला आहे. 

टोलच्या दरात वाढ झाल्यामुळे सातारा- पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, टोलच्या दरात वाढ नवीन नसून नियमित आहे. तीन वर्षानंतर शासनाच्या अधिसूचनेनुसार टोलच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरील कामे अपूर्ण असल्याने तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने वाढीव टोल देण्यास वाहनधारकांचा विरोध आहे.

error: Content is protected !!