सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात लॉकडाऊनच्या आदेशानंतर नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडत असून रस्त्यावर गर्दी करीत आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करत रस्त्यांवर वाहनांवरून फिरणाऱ्या नागरिकांवरही आता पोलिसनातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. सध्या पोलिसांकडून अशा नागरिकांविरोधात मनाई आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत असून शेकडो नागरिकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आज 1395 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 15 बाधितांचा मृत्यु झाला. हा आकडा वाढत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता सर्वच आस्थापने, दुकाने बंद आहेत. मात्र, तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरताना दिसत होती.
संचारबंदीचे उल्लंन होत असल्याने अखेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाईचा बडगा विरारमध्ये शुक्रवारपासून उगारण्यात येत आहे. जवळपास शेकडोहून अधिक नागरिकांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याविरोधात मनाई आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या अशा नागरिकांवर या पुढे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी करोनाचे गांभीर्य समजून विनाकारण घराच्या बाहेर निघू नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
You must be logged in to post a comment.