साताऱ्यात मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन उत्साहात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा आज ८३ वा वर्धापन दिन साताऱ्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, शरद काटकर, दीपक प्रभावळकर, शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दीपक शिंदे, संग्राम निकाळजे, सुजित आंबेकर, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सनी शिंदे, चंद्रसेन जाधव व पत्रकार बांधव उपस्थित होते,

पाटणे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण तर मिळालेच त्याचबरोबर पत्रकार पेन्शन योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी , छोट्या वृत्तपत्रांचे प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर स्मारक यासारखे किमान २५ विषय मार्गी लागले आहेत. आपले न्याय्य हक्क आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी सत्तेबरोबर चार हात करताना कोरोना काळात मराठी पत्रकार परिषदेने गरजू पत्रकारांना आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तूंची मदत देखील केलेली आहे. गंभीर आजार असलेल्या असंख्य पत्रकारांना परिषदेने थेट आर्थिक मदत करून पत्रकारांप्रतीचे आपले उत्तरदायित्व निभावले आहे.

error: Content is protected !!