सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : किसनवीर कारखान्याला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 4 महिने शिल्लक आहेत. या कारखान्याचा गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहे. हा माझा विषय नाही हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. या चार महिन्यातच सर्व देणी आणि बँकांचे व्याज द्यावे लागणार आहे, ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सातार्यात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, किसनवीर कारखान्याचा आढावा घेतला असून कारखान्यावर 906 कोटींचे कर्ज आहे. सोमवारी याबाबत आणखी महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे. कारखान्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यात येणार आहे. किसनवीरच्या कर्जाच्या रकमेत नवीन कारखाने सुरू करता येईल. सत्ताधार्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला त्यामुळेच शेतकर्यांनी त्यांना पराभूत केले.
साखर कारखान्यांच्या शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. कारखान्यांचे हंगाम संपत आले असले तरी नजिकचा ऊस तुटावा यासाठी रिकव्हरी लॉस व वाहतुकीचे अनुदान सरकारकडून दिले जात असून, ऊस उत्पादकांचा तोटा होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.
You must be logged in to post a comment.