पत्रकारांच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळाकडून उपमुख्यमंत्र्यांना निवदेन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनामुळे राज्यात १२२ पत्रकारांचा वृत्तांकन करीत असताना मृत्यू झाला असून मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी, सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून लस उपलब्ध करून द्यावी या मागण्यांसाठी जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून वृत्तांकन करण्याचे काम करीत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून पहिल्या टप्पात लस दिली. वैद्यकीय सेवा, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत पत्रकारही वृत्तांकन करीत आहेत. हे करीत असताना अनेक पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये काही पत्रकारांना उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत मिळावी,पत्रकारांना कोरोना लस प्राधान्याने द्यावी,कोरोना पॉझिटिव्ह पत्रकारांच्या उपचारासाठी रुग्णालयात बेड सुविधा अग्रक्रमाने मिळाव्यात.इत्यादी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुजीत आंबेकर, तुषार तपासे, ओमकार कदम, सनी शिंदे यांच्या शिष्टमंडळाने पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे वयोगटाचा विचार न करता सरसकट लसीकरण करावे. याबाबतचे कॅम्प स्वतंत्रपणे आयोजित करावेत. दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना किमान ५ लाख रुपये मदत करावी. जिल्ह्यातील मुख्य कोवीड हाॅस्पीटलमध्ये व तालुका पातळीवरील हाॅस्पीटलमध्ये पत्रकारांसाठी तातडीने बेड राखीव ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली.

error: Content is protected !!