अतिवृष्टीमुळे बाधित शेत जमिनीसाठी मशिनरींना लागणारे इंधन हे जिल्हा नियोजन समिती पुरविणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जी शेती उध्वस्त झाली ती उभी करण्यासाठी खंडाळा तालुक्यातून मशिनरी मिळणार असून, त्या मशिनरींना लागणारे इंधन हे जिल्हा नियोजन समिती पुरविणार असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी हिरडा विश्रामगृहावर झालेल्या वाई महाबळे-थर खंडाळा तालुका आढावा बैठकीत दिली.

यावेळी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील या देखील उपस्थित होत्या. जुळै महिन्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे वाई आणि महाबळेश्वर तालुक्‍याच्या पश्चिम भागातील शेती, रस्ते, पूल, घरे, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई शासनाने दिली असली तरी ती भरपाईतून शेती उभी राहू शकत नाही म्हणून आमदार मकरंद पाटील यांनी गेली दोन महिने शोती क्षेत्र दुरूस्तीसाठी मशिनरी मिळविण्यासाठी परीश्रम घेतले व शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी शब्द टाकला. त्या ठिकाणाहून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

खंडाळा तालुका अशा मशिनरी पुरविण्यासाठी पुढे आला असून, तालुक्‍यातून महाबळेश्वर व वाई तालुक्यासाठी 10 पोकलेन व 60 जेसीबी पुरविण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे या सर्व मशिनरींसाठी 1 लाख 52 हजार लिटर डिजेल हे जिल्हा नियोजन समिती पुरविण्यास तयार आहे. ही सर्व मशिनरी 1 फेब्रुवारीपासून कामाला शुभारंभ करणार आहे.

error: Content is protected !!