सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज किल्ले प्रतापगडला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली. यानंतर त्यांनी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील व पोलीस उपअधीक्षक (वाई)डॉ शीतल जानवे-खराडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत.त्यांचा मुक्काम येथील राजभवन मध्ये आहे. यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.
You must be logged in to post a comment.