सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध महिलेचा तिच्याच नातवाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. वडीलोप्रर्जित शेतजमीनीच्या वाटपाच्या कारणावरुन चिडुन जावून नातू आकाश सुखदेव शिंदे (रा.ठाकुरकी मळा ता. फलटण, जि. सातारा, हल्ली रा. आवी, ता. पंढरपूर, जि. सोलापुर) याने आजींचा खून केला. मंगल बबन शिंदे (वय ६५ रा.ठाकुरकी मळा, ता. फलटण, जि. सातारा) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगल शिंदे या नेहमी प्रमाणे शेळ्या चारण्यासाठी फलटण शहरातील विमानतळ येथे गेलेल्या होत्या. तेथे नातू आकाश सुखदेव शिंदे याने सायकाळच्या सुमारास लाकडी काठीने आज्जीला मारहाण केली.
त्यावेळी वृद्ध आज्जी ही जमिनीवर पडली असता, आकाश याने एक मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला.मंगल शिंदे या जागीच ठार झाल्या आकाश याचा लोकांनी पाठलाग केला असता तो पोलिस ठाण्यात हजर झाला
गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते
You must be logged in to post a comment.