सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवावी,अशी मागणी शाहूनगरी फाैंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भाेसले यांनी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.दरम्यान वृषालीराजे भाेसले यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागास खरमरीत पत्र लिहून शिवतीर्थ येथील काेट्यावधीच्या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वृषालीराजे भाेसले यांनी आज (शुक्रवार) सातारा पालिकेत आपल्या मागणांबाबतचे निवेदन प्रशासनास दिले. या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आणि शिवतीर्थाला शोभेल असा कलाकुसर असणारा भव्य दरवाजा बसवावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवावी असे नमूद केले आहे.त्या म्हणाल्या शिवतीर्थ येथे सध्या झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे.
काेट्यावधी रुपये खर्च हाेत असताना त्या ठिकाणी पत्र्याचे प्रवेशद्वार लावण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शाेभणारे एेतिहासिक कलाकुसर असलेले प्रवेशद्वार तातडीनं बसवावे. या बराेबरच सध्या झालेल्या कमानीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चहूबाजूंनी नागरिकांना दिसत नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे गरजेचे आहे.निवेदन देताना माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, मनोज शेंडे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, संग्राम बर्गे, सुशांत मोरे, विवेक निकम व नागरिक उपस्थित होते.
गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजीराजे यांचे भव्यदिव्य स्मारक किंवा पुतळा उभारावासार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात मराठ्यांची राजधानी असणाऱ्या सातारा शहरात छत्रपती संभाजीराजे यांचे साधे स्मारक किंवा पुतळा सुधा नसून हे अतिशय क्लेशदायक आहे. त्यामुळे ऐतिहसिक शाहूनगरीत गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजीराजे यांचे भव्यदिव्य स्मारक किंवा पुतळा उभारावा अशी मागणी शाहूनगरी फाैंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भाेसले यांनी केली आहे.
You must be logged in to post a comment.