सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : तरडगाव (ता. फलटण) येथे जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केला. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, पांढरी तरडगाव (ता. फलटण) येथील आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन तिच्या पाच महिन्याच्या बाळाला १२ एप्रिल रोजी दुपारी ठार मारुन पुरल्याची माहिती दिली. आईला लोणंद पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खुनाचे कारण अद्याप कळू शकले नाही.
You must be logged in to post a comment.