सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बहिणाला त्रास देणाऱ्या मेव्हण्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या प्रेयसीचाच खून केल्याचे पोलिसांच्या तापासात उघड झाले आहे. कार्वे ते कोरेगाव रस्त्यावरील खूनाचे पोलिसांनी अवघ्या चार तासात उकलले आहे. त्यात प्रकरणी येरवळे येथील शरद हणमंत ताटे (वय ३३) यास पोलिसांनी अटक केली आहे.
रात्री कार्वे येथे कोरेगाव रस्त्यावर भैरवनाथ मंदिरा शेजारीच कृष्णा नदीचे पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिलेचा खून झाल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तात्काळ घटनास्थळी येवून पोलिसांनी पहाणी केली. अनोळख्या महिलेचा डोक्यात दगड घालून खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या महिलेजवळ आधारकार्ड सापडले. त्यातील संबधिताकडे तपासणी केली तरिही पोलिसांच्या हाती काही सापडले नाही.
पोलिसांच्या चाणाक्षपणाने आधारकार्ड सापडलेल्या व्यक्तीच्या मेव्हणावर पोलिसांनी लक्ष केंद्रत केले. तालुका व सातारच्या एलसीबीच्या पथकाने संयुक्तपणे तपास करत अवघ्या चार तासात खूनाचे गुढ उकलले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी भेट देवून पहाणी केली. सातारा एलसीबीचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ, आनंदराव खोबरे यांच्या नेतृत्वाखाली तपास झाला. एलसीबीचे सहायक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे व फौजदार गणेश वाघ यांचे स्वंतत्र पथक तपास करत होते. त्यांनी तपासाची सुत्रे हलवली. मृत महिलेच्या अंगावर पडलेली चिठ्ठीच तपासाचा धागा बनली.
You must be logged in to post a comment.