यापुढचे पत्रकार दिन सातारा जिल्हा पत्रकार भवनातच : हरीष पाटणे

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा जिल्हा पत्रकार भवन हे संघटनात्मक कारकिर्दीतले स्वप्न होते. ते पूर्णत्वाला जात असल्याचा आनंद व अभिमान आहे. लवकरच सातारा जिल्हा पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा घेवू. या पुढचे पत्रकार दिन या पत्रकार भवनातच असतील. जिल्ह्यातील ११ तालुका पत्रकार संघांना सोबत घेवून उद्घाटनाचा कार्यक्रम करू. सातारा जिल्हा पत्रकार संघाने केलेले हे काम जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनी दिलेली ही भेट आहे,असे गौरवोद्गार सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी काढले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मराठी पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दीपक शिंदे, जेष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुजित आंबेकर, डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सनी शिंदे, चंद्रसेन जाधव यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती.

हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार भवनासाठी खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरसेवक ॲड.डी. जी. बनकर यांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळेच महाराष्ट्रात कुठेही नसेल एवढी चार मजली इमारत जिल्हा पत्रकार भवन म्हणून आकाराला आली आहे.गेल्यावर्षीच्या पत्रकार दिनी पत्रकार भवनाचा संकल्प केला आणि वर्षात पत्रकार भवन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उभे करून दाखवले. पुढच्या महिन्यात त्याचा लोकार्पण सोहळा घेवू आणि पुढचा पत्रकार दिन सातारा जिल्ह्याच्या हक्काच्या सातारा जिल्हा पत्रकार भवनात असेल ही आपली सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांना पत्रकार दिनी भेट आहे,असेही पाटणे म्हणाले.

शरद काटकर म्हणाले,सातारच्या पत्रकारितेतील एकजूट कायम रहावी. पत्रकारांच्या समस्या शासनदरबारी कशा मांडता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. अधिस्वीकृती कार्ड मिळण्यासाठी निकष कमी होवून हे कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.हरीष पाटणे व सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा पत्रकार भवन उभे करून अनेक वर्षांचे पत्रकारांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

विनोद कुलकर्णी म्हणाले,गतवर्षी पत्रकारांच्या हक्काचे भवन उभा करू, असा शब्द मी व हरीष पाटणे यांनी दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे. हरीष पाटणे यांना सातारा जिल्हा पत्रकार भवन उभे करताना अनेक अडथळे आले मात्र हे भवन उभे करण्यात आम्ही यशस्वी झालो. पुढील महिन्यात त्याच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होवून लोकापर्णाचा सोहळाही होईल. हरीष पाटणे यांनी अनेक आव्हानांचा सामना करून त्यांनी हे पत्रकार भवन उभारले आहे. त्यांची कारकिर्द उल्लेखनीय झाली आहे. हरीष पाटणे यांच्यासारखे काम कुणालाही करता आलेले नाही.त्यांच्या कार्याची नोंद सातत्याने घेतली जाईल.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार केशव चव्हाण, प्रवीण शिंगटे, विठ्ठल हेंद्रे, आदेश खताळ, महेंद्र खंदारे,विनीत जवळकर, प्रतीक भद्रे, मनोज पवार,संदीप कुलकर्णी, महेश पवार,प्रशांत शिराळकर, दत्ता सुपेकर, महेश चव्हाण, अमित वाघमारे, सूर्यप्रताप कांबळे, प्रकाश वायदंडे, मृणाल देवकुळे व पत्रकार उपस्थित होते

error: Content is protected !!