सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी सरकारची भूमिका आहे. याबाबत निवडणूक आयोगाची चर्चा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
नायगाव (ता. खंडाळा) येथील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारक परिसरात अभिवादन करण्यासाठी ते आले असता बोलत होते.
ना. पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रासह अन्य राज्यातही निर्माण झालेला आहे. आपल्या संविधानाने सर्वच घटकांना लोकप्रतिनिधित्व मिळावे यासाठी तरतूद केलेली आहे. याला अनुसरूनच राज्य सरकारने आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गालाही प्रतिनिधित्व मिळावे यासाठी विधिमंडळात ठराव केला आहे.
You must be logged in to post a comment.