जेबीजी सातारा हिल हाफ मॕरेथाॕन स्पर्धेचा आज थरार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी सातारा हिल हाफ मॕरेथाॕन स्पर्धा आज रविवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. या स्पर्धेचे हे १२ वे वर्ष असून यंदा रेकॉर्ड ब्रेक ७५०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. प्रत्यक्ष स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ६.३० वाजता होणार असून त्यासाठी सर्व स्पर्धकांनी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पोलीस परेड ग्राऊंड येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

दरम्यान, या स्पर्धेचा शुभारंभ पालकमंत्री श्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ.उदयनराजे भोसले, आ.श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले व स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेले जय बालाजी ग्रुपचे डायरेक्टर श्री गौरव जजोदिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शल्य शल्यचिकित्सक श्री युवराज करपे, मुख्य वनसंरक्षक भारद्वाज मॕडम, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजीत बापट यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सर्व मान्यवरांच्या व जिल्हा पत्रकार संघाचे श्री हरीष पाटणे व दैनिक पुण्यनगरीचे संपादक श्री विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या स्पर्धेची सुरुवात ही पोलीस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर ही स्पर्धा पारंगे चौक, पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगरपरिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या पुढे २०० मीटर पुढे जाऊन त्याच मार्गाने येऊन पुन्हा पोलीस परेड ग्राउंड येथे या स्पर्धेची सांगता होईल, अशी माहिती सातारा रनर्स फौंडेशनचे संचालक अॕड कमलेश पिसाळ, डाॕ चंद्रशेखर घोरपडे, डाॕ प्रतापराव गोळे, सीए विठ्ठल जाधव, डॉ देवदत्त देव यांनी संयुक्तरित्या दिली आहे.

२१.१ कि.मी.अंतराच्या या स्पर्धेच्या मार्गावर आठ ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात आली असून १ ले मदत केंद्र नगरपालिका येथे असून हे ढाणे मेघा इंजिनीअरिंग क्लासतर्फे भाग्यश्री ढाणे, विशाल ढाणे सर व त्यांच्या क्लासची टीम ही जबाबदारी सांभाळणार आहे. २ रे मदत केंद्र गोविंदनगरी येथे असून डॉ कैलास खडतरे, डॉ दीपक थोरात व १०० केपी यांची टीम स्पर्धकांना मदत करणार आहे. MR असोसिएशन यांची टीम तर ३ रे मदत केंद्र यवतेश्वर घाटातील पॉवर हाऊस येथे असून पौर्णामा फडतरे, भाविका मुथा, शिला नलवडे व पोदार इंटरनॅशनल स्कूलची टीम स्पर्धकांना मदत करणार आहे. ४ थे मदत केंद्र घाटातील खाणीजवळ असून हे मदत केंद्र डॉ दीपक बनकर, आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व महाराजा ग्रुपची टीम स्पर्धकांना मदत करेल. ५ वे मदत केंद्र साईबाबा मंदिर येथील हॉटेल सेव्हन हिल्स येथे असून डाॕ अश्विनी देव, सौ सीमा भोसले, केतकी पंडित व नेहा दोशी यांच्याबरोबर भंडारी ब्रदर्सच्या सौ श्रुती भंडारी व क्रेडाईची महिला टीम त्यांना सहाय्य करणार आहे. ६ वे मदत केंद्र हे हॉटेल ऋतुगंध येथे असून आदीश पाटील, सारंग गुजर, शिल्पा जाधव व गुजराथी वैष्णव समाजाची टीम ही जबाबदारी सांभाळतील. ७ वे मदत केंद्र नित्यमुक्त साई रिझॉर्ट येथे असून डाॕ सुचित्रा काटे, डॉ कविता बनकर व निशात पंडित, प्रफुल्ल पंडित व विद्यार्थी वाहतूक सेवा संघाची टीम, जितेंद्र भोसले यांची चिअरींग टीम ही जबाबदारी सांभाळणार आहेत. शेवटचे मदतकेंद्र हे टर्न अराऊंड येथे अनिल नलवडे व डॉ महेश विभुते व त्यांची टीम हे मदत केंद्र सांभाळणार असून यावर्षी कुल झोनची देखील व्यवस्था करण्यात आली असून समर्थमंदिर येथील कुल झोन हे पंकज नागोरी तर हॉटेल निवांत येथील कुल झोन हे मिलिंद हळबे हे सांभाळणार आहेत.मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनामध्ये संपूर्ण घाटातील योग्य वेळी व योग्य ठिकाणी ट्रॅफिक कोनचे नियोजन करणे ही जबाबदारी डॉ अविनाश शिंदे, दिनेश उधाणी, शैलेश ढवळीकर व त्यांचा १३ भवानी ग्रुप, कैलास बागल सरांचा सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप, मारवाडी चौक गणेशोत्सव मंडळ, श्रीनिधी पतसंस्था, हिंदवी पब्लिक स्कूल, रोटरी क्लब आॕफ सातारा कॕम्पचे सदस्य स्पर्धा मार्गावरील कोन मॕनेजमेंटचे व्यवस्थापन करणार आहे. तसेच स्पर्धेच्या मार्गाचे मोजमाप करणे ही जबाबदारी डॉ अविनाश शिंदे, डाॕ अजय शेडगे, डाॕ विकास पाटील, शैलेश ढवळीकर, डॉ राजेश शिंदे, दिनेश उधाणी, भास्कर पाटील, प्रफुल्ल पंडित यांनी घेतली आहे.

स्पर्धेचे मेडिकल डायरेक्टर डाॕ प्रतापराव गोळे व डाॕ सोमनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या मार्गावर इमर्जन्सी कार्डियाक रेसिसिटेशन (CPR) चे प्रशिक्षण घेतलेले संयोजन समितीमधील सदस्य तसेच शासकीय वैद्यकीय महाविदयालय, सावकार गवळी काॕलेजचे विद्यार्थी तैनात करण्यात आले आहेत. प्रतिभा हाॕस्पिटल अॕन्ड हार्ट केअर सेंटर हे स्पर्धेचे मेडिकल पार्टनर आहेत. तसेच स्पर्धेच्या मार्गावर अॕटोमॕटिक इलेक्ट्रिक डिफिब्यूलेटरची (AED) व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्पर्धा मार्गावर ६ कार्डिअॕक अॕम्ब्युलन्स, साध्या अॕम्ब्युलन्स, टू व्हिलर अॕम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक अॕम्ब्युलन्समध्ये एक फिजिशिअन व दोन मदतनीस असणार आहेत. त्याचबरोबर फिजिओथेरिपिस्ट डाॕ स्वप्ना शेडगे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा इन्स्टिट्यूट आॕफ मेडिकल सायन्सेस कराड येथील टीमदेखील तैनात असणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा भूलतज्ञ संघटनेचे सर्व डाॕक्टर्स डाॕ अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज असणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेचा एक्स्पो व पोलीस परेड ग्राउंड येथील तयारीसाठी आर्किटेक्ट सुधीर शिंदे व उपेंद्र पंडित हे गेल्या महिन्यापासून तयारी करीत असून स्टॉल, स्टेज व स्पर्धकांसाठी लाईनअप सुविधा यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

स्पर्धकांना मेडल देण्याची जबाबदारी डाॕ राजेश शिंदे व नितीन किरवे यांच्या बरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सांभाळणार आहेत. तसेच स्पर्धकांसाठी पाणी, एनर्जी ड्रिंक्स व अल्पोपहार व्यवस्था करण्यासाठी इर्शाद बागवान, संग्राम कदम व अॕड कमलेश पिसाळ हे विशेष काळजी घेत आहेत.

सातारा रनर्स फौंडेशनने स्पर्धेच्या मार्गावरील स्वच्छतेची विशेष काळजी घेतली असून गेले काही आठवडे ते स्पर्धेच्या मार्गावरील विविध ठिकाणी स्वच्छता करून घेत आहेत. स्पर्धेदरम्यान विद्युत व्यवस्थापनाची जबाबदारी ही मंगेश वाडेकर हे पाहत असून एक्स्पो व रेसच्या ठिकाणी तयारी ही पूर्णत्वास आली आहे. तसेच स्पर्धा संपल्यानंतर कुठेही कचरा रहाणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन डॉ देवदत्त देव, महेश विभुते, पायल विभुते करीत आहेत.

यावर्षीच्या स्पर्धेचे रेस डायरेक्टर श्री अभिषेक भंडारी हे साताऱ्यातील उत्कृष्ट मॅरेथॉन धावपटू असून त्यांनी आजवर अनेक मॅरेथॉन स्पर्धा अतिशय कमी वेळात पूर्ण केल्या आहेत. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत.

संपूर्ण देशभरात नावाजल्या गेलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा पोलीस प्रशासन, वाहतूक नियंत्रण कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालय, सातारा नगरपालिका, एस.टी महामंडळ आणि वन विभाग यांनी प्रशासकीय सेवांची बांधणी केली आहे.तसेच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराजा ग्रुप, जेष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प, ढाणे मेगा इंजिनीरिंग क्लास, प्रतिभा हॉस्पिटल, सुविधा पेन्ट्स, मीनाक्षी हॉस्पिटल, सावकार इंजिनीरिंग कॉलेज, सूर्यप्रभा हॉस्पिटल, यशोदा टेक्निकल इन्स्टिटयूट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कन्याशाळा, कनिष्क नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, आय.डी बी.आय. बँक, हिंदवी पब्लिक स्कूल, श्रीनिधी पतसंस्था, मारवाडी चौक मित्र मंडळ, अनंत इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघटना, १३ भवानी ग्रुप, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा इंग्लिश मेडीअम स्कूल व विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनानी देखील कंबर कसली असून, याबरोबरच यवतेश्वर व सांबरवाडी ग्रामस्थांनीदेखील जोरात तयारी सुरु केली असून ग्रामस्थांनी येणाऱ्या पाहुण्यांची उत्तम व्यवस्था होण्यासाठी व स्पर्धेच्या नियोजनात मदत करण्यासाठी अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे.

स्पर्धकांसाठी साताऱ्यातील सर्व हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग फुल्ल झाले असून विविध कार्यालयामध्येही स्पर्धकांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्यास सातारकरांनी पाहुण्या स्पर्धकांची निवासाची व्यवस्था आपल्या घरात करावी असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

सातारकरांनी या उपक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात दाखल होणाऱ्या आपल्या पाहुण्यांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांना मदत करावी व ऐतिहासिक सातारा नगरीचा लौकिक वाढवण्यामध्ये सातारा रनर्स फौंडेशनच्या सर्व संचालकांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे या आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक डाॕ संदीप काटे, रेस डायरेक्टर श्री अभिषेक भंडारी तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष श्री जितेंद्र भोसले, उपाध्यक्ष श्री निशांत गवळी व सचिव डॉ. रंजिता गोळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!