सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुरू असलेले कार्य सर्वोत्कृष्ट असून राज्यातील संघटना देखील सातारच्या पत्रकार संघटनेचे आदर्श घेतील तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मराठी पत्रकार परिषदेची सोशल मीडिया संघटनाही साताऱ्यात जोमाने काम करत असून जिल्ह्यातील 70 पत्रकारांना अपघात विम्याचे संरक्षण देणारी राज्यातील पहिली सोशल मीडिया संघटना ठरली आहे, असे गौरवोद्गार मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी काढले.
साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या पत्रकारांना 1 लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, खजिनदार प्रशांत जगताप,जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत जाधव, प्रतीक भद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी देखील सातारच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेत सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार मराठी पत्रकार परिषदेच्या छत्राखाली नेहमीच एकत्र येतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी या एकीचा आजवर फायदा झाला आहे असे मत व्यक्त करत लवकरच जिल्हाभर सोशल मीडिया संघटनेचा विस्तार देखील करू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी बोलताना व्यक्त केले आहे
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी हरिष पाटणे यांचे नेतृत्व आजवर यशस्वी ठरले असून यापुढे देखील आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करू असे मत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांनी केले तर जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत जाधव यांनी या कार्यक्रमाचा आभार मानले.
यावेळी पुणे दर्शनचे संपादक विश्वास शिंदे, पुणे दर्शनचे प्रतिनिधी अतुल वैराट, पिंपरी-चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे, कोषाध्यक्ष सुनील कांबळे, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र गवळी, गणेश शिंदे ,प्रशांत बाजी, सचिन मदने यांची प्रमुख उपस्थिती होती..
You must be logged in to post a comment.