सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ढाकणी ता. माण येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ जोगेश्वरी मंदिरातील चांदीच्या अंदाजे दोन किलो वजनाच्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीच्या चांदीच्या मूर्ती मंदिरातून लंपास केली. ही घटना शनिवारी दुपारनंतर घडली.
म्हसवड-मायणी रस्त्यावर म्हसवडपासून तेरा किलोमीटर अंतरावर ढाकणी ता. माण हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ आसून ग्रामदेवताचे मंदिर गावच्या मध्यभागी ओढ्याच्या काटावर आहे. गावातील नागरीक शेतात गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिर परिसरात कोणी नसल्याचा बघून मंदिराच्या बाहेरील ग्रीलचे व गाभाऱ्यातील दोन्ही कुलपे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चांदीच्या अंदाजे एक एक किलो वजनाच्या श्री सिध्दनाथ व जोगेश्वरीची मूर्ती अंदाजे एक लाख तीस हजार रुपये किंमतीची घेऊन चोरटे पसार झालेचे निदर्शनास पुजारी मंदिरात सायंकाळची दिवाबत्ती करायला आल्यावर निदर्शनास आले. लागलीच पुजाऱ्याने गावकऱ्याना चोरीची माहिती समजल्यानंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून रात्री उशिरा म्हसवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
You must be logged in to post a comment.