पहाटे चालण्यास गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) – लोणंद-खंडाळा रस्त्यावर शेळकेवस्तीजवळ आज पहाटे चालण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात पती, पत्नी आणि सून अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, लोणंद-खंडाळा रस्त्यावर शेळके वस्ती जवळ पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बबन नाना धायगुडे (वय ७०), शांताबाई बबन धायगुडे (वय ६४) व सारिका भगवान धायगुडे (वय ३४) हे तिघे चालण्यासाठी घऱाबाहेर पडले. यावेळी समोरून आलेल्या भरधाव कारने तिघांना धडक दिली. यात तिघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, कारचालक अपघातानंतर निघून गेला. वाहनाचा बंपर आणि नंबर प्लेट घटनास्थळी आढळून आली आहे. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

error: Content is protected !!