सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : येथील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवेळी आखाड्याजवळ दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन चेन हिसकावल्या. याप्रकरणी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा नोंद असून सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलात चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होती. शनिवारी सायंकाळी सवा सातच्या सुमारास महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढत होती. यावेळी अज्ञाताने दोघांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. याप्रकरणी शंभूराज शिवाजी भोसले (वय २५, रा. भोसले मळा, न्यू राधिका रोड) सातारा यांनी तक्रार दिली आहे. या जबरी चोरीत कुस्ती आखाड्याजवळ तक्रारदाराच्या गळ्यातील जाड पिळाची अडीच तोळे वजनाची चेन हिसकावून नेली. तसेच स्वप्नील शंकर घोडके (वय २८, रा. विजयनगर, ता. कºहाड) यांच्या गळ्यातूनही चार तोळे वजनाची चेन नेण्यात आली.या दोन्ही घटनांत साडे सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन चेन चोरीस गेल्या आहेत. याची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे
You must be logged in to post a comment.