सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : महागाव येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर महेशच्या मोबाईलमध्ये एक कॉल रेकार्ड आढळला असून त्याद्वारे तीन सावकारांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश अरविंद गायकवाड, प्रमोद नारायण गायकवाड (दोघे रा.क्षेत्रमाहुली, सातारा) व निलेश विष्णूपंत तांबोळी (रा. महागाव, ता.सातारा) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्तसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी मृत महेश चव्हाण यांचे वडील माणिक सोपान चव्हाण (वय ६२, रा. महागाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे
You must be logged in to post a comment.