सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड तालुक्यातील जुने येरवळे गावातील नागरिकांना धामण जातीच्या सापांचा खेळ पाहायला मिळाला. दुपारी भर उन्हात हा खेळ चांगला रंगला होता. सापांचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळताचं परिसरात लोकांची गर्दी झाली.
अनेकांनी सापांचा खेळ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. विशेष म्हणजे लोकांची गर्दी असताना सुध्दा साप जागेवरून हलले नाहीत. बराच काळ त्याचा खेळ रस्त्याच्या एका कोपऱ्यात सुरू होता. कराड परिसरात साप खेळत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शेतात किंवा अडचणीच्या ठिकाणी सापांचा असा खेळ पाहायला मिळतो. परंतु काल येरवळे गावातील नागरिकांना सापांचा खेळ रस्त्यात पाहायला मिळाला.
You must be logged in to post a comment.