महाबळेश्वर रस्त्यावर दिसले २ वाघ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर पर्यटकांना रात्री दोन वाघ दिले. दरम्यान, वाघांना पाहिल्यानंतर पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. काही पर्यटकांनी गाडीतून वाघाच्या हालचालींचा व्हिडोओ तयार करुन सोशल मिडियावर व्हायरलही केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महाबळेश्वर-पाचगणीमध्ये रस्त्यावर एक वाघ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून बाहेर रस्त्यावर आला आणि त्यानंतर दुसरा बाजूला उभ्या असलेल्या बाईकपर्यंत येऊन पुन्हा तिथून तो बाहेर आला त्या दिशेला निघून गेला. यावेळी गाडीतले सगळे शांत बसले असून मागे जाण्याचं ऐकमेंकांना सांगत होते.

error: Content is protected !!