जिल्हावासीयांना टोलमाफी द्या ; रिपाईची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बंगलोर महामार्गावरील आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर सातारा जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी निदर्शने केली.

error: Content is protected !!