टोल दरवाढीविरोधात उदयनराजे आक्रमक

संग्रहित

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे 5 टक्के करण्यात आली आहे. ती अन्यायकारक व प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहणारी आहे. त्यामुळे ही टोल वाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे की, सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. असलेले सेवा रस्ते अत्यंत खराब आहेत. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत का नाहीत हे देखिल समजत नाही. रस्त्यांवरील खडुयांची तर मोजदाद ही करता येत नाहीत इतके असंख्य खड्डे आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खरंच आहे का असा प्रश्न वाहनचालकांना आणि प्रवाशांना पडत असतो. दिशादर्शक स्थलदर्शक फलकांची वानवा आहे. काही वेळा अपरिचित वाहनचालकांला एखादे गांव कधी आपण मागे टाकले हे देखिल कळत नाही. महामार्गावर शौचालय ट्रक ले-बाय इत्यादी बाबी तर सुरुवातीपासूनच गायब आहेत.

सध्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथॅरिटी ऑफ इंडियाने) आणि टोल चालवणा-या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करुन, प्रवाशी आणि वाहनचालक/धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी तसेच नुसती दरवाढ मागे न घेता, जुन्या दरात 5 टक्यापेक्षा जास्त रक्कमेची टोल करकपात करावी अशी मागणी नागरीक-प्रवाशी आणि वाहनचालकांच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.


error: Content is protected !!