कुंभरोशी गावात अडकले १९ पर्यटक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अतिवृष्टीमुळे आंबेनळी व पोलादपूर या दोन्ही घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी बारामतीहून प्रतापगडावर पर्यटनासाठी आलेले १९ पर्यंटक अकडले आहेत.

महाबळेश्वर मार्गे प्रतापगड व कोकणाकडे जाणाऱ्या मुख्य घाटरस्त्याची दुरावस्था झाली असून प्रतापगड पासून पोलादपूर कडे जाणाऱ्या घाटरस्यावर देखील दरडी कोसळल्याने हा देखील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे बारामतीहुन दापोली येथे तीन कुटुंबीय पर्यटनासाठी गेली होती ही कुटुंबीय महाबळेश्वरमार्गे पुन्हा बारामतीकडे परतणार होते. तर पुणे येथून महाबळेश्वर पर्यटनास आलेले काही पर्यटक हे किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी गेले होते.

हे सर्वच जण आंबेनळी व पोलादपूर घाट रस्ते बंद झाल्याने ”इकडे आड तर तिकडे विहीर” अशीच काहीशी अवस्था या लोकांसह पर्यटकांची झाली मात्र गेली तीन दिवस प्रतापगड पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी गावातच या १९ लोकांसह आणखी काही लोकांची वाडा कुंभरोशी ग्रामस्थांसह राहण्याची जेवणाची सर्वच व्यवस्था केली आहे. यामध्ये काही लहान मुले स्त्रियांचा देखील समावेश होता

error: Content is protected !!