महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी

वेण्णा लेक परिसरात कडाक्याची थंडी पडल्याने नयनरम्य दृष्य पहावयास मिळत आहे.

महाबळेश्वर (भूमीशिल्प वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये नाताळ आणि वर्षाअखेरीसच्या निमीत्ताने सर्व हॉटेल व रिसॉर्ट पर्यटकांनी भरलेली आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला स्ट्राॅबेरी फळांचे स्ट्राॅल लागले आहे. तसेच कडाक्याची थंडी पडल्याने महाबळेश्वरमधील वेण्णा लेकमध्ये नयनरम्य दृष्टी पहावयास मिळत आहे

करोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटनस्थळे ओस पडले होते. महाबळेश्वरमध्येही सहा महिने पर्यटक फिरकले नव्हते. मात्र, अनलॉक केल्यानंतर पर्यटकांचा अल्पप्रतिसाद मिळत होते. पण सध्या नाताळ आणि वर्षाच्या अखेरीमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडल्यामुळे स्थानिक भागात स्ट्रॉबेरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.

महाबळेश्वरला रस्त्याच्या कडेला स्टॉल लावत शेतकऱ्यांनी आपला धंदा सुरु केला आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची ख्याती ही जगभरात आहे, मग फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही हे लालभडक गोड फळ घ्यायचा मोह आवरत नाही. सध्या या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगलीच मागणी आहे.

error: Content is protected !!