सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :पुणे – बेंगलोर महामार्गावर खंबाटकी बोगद्यात झालेल्या अपघातामुळे वेळे येथील महामार्गावर तब्बल पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी सायंकाळी चार वाजलेपासून ही रांग वाढतच चालली होती. नाताळची सुट्टी संपल्याने व रविवार असल्याने बाहेर गेलेले पर्यटक पुन्हा परतू लागल्याने महामार्गावर वाहनांची तुफान गर्दी होती.
दोन तासापासून अधिक वेळ ही रांग अगदी कासवगतीने पुढे सरकत होती. त्यामुळे महामार्ग गाड्यांच्या गर्दीने भरून गेला होता. यामुळे प्रवाशी मात्र प्रचंड त्रस्त झाले होते. त्यातच अनेक गाड्या बंद पडू लागल्याने देखील प्रवाशी वैतागले होते. तसेच सायंकाळच्या वेळी शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांना देखील रस्ता ओलांडणे कठीण झाले होते.
You must be logged in to post a comment.