सातारा भूमिशिल्प वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कण्हेर धारणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कण्हेर धरणातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. प्रत्येक व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला हा व्हिडीओ आणि त्याचे फोटो होते.
कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यावेळी सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भास होतो. पहिल्यांदाच या प्रकारे कण्हेर धरणाला रोषणाई करण्यात आली. या धरणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धरणाच्या पाण्यातील तिरंगा पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
You must be logged in to post a comment.