सातारा,(भुमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा पातळीवर खासगी दुरदर्शन वाहिन्यांसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी साताऱ्यातील पत्रकार तुषार तपासे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी या समितीचे चेअरमन असून त्यात जिल्हा पोलिस प्रमुख, महिला एनजीओ सदस्य, बालकांसाठी काम करणारे सदस्य, मानसशास्त्र विभागातील सदस्य, इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधी व जिल्हा माहिती अधिकारी सदस्य सचिव असे मिळुन ७ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती जिल्हास्तरावरिल एफ.एम रेडिओ, इलेक्ट्रॉनिक मिडिया वरील बातम्या या वेळोवेळी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच होतात का? कोण कायद्याचा दुरूपयोग करतंय का? यावर लक्ष ठेवून या संदर्भात तक्रार आल्यास या तक्रारीवर ही समिती बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेउन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवायचे का नाही याचा निर्णय घेते.या समितीवर इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधी सदस्य म्हणून पत्रकार तुषार तपासे यांची निवड करण्यात आली आहे.
तपासे यांची समितीवर निवड झाल्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाअध्यक्ष हरिष पाटणे,शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार शरद काटकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिपक शिंदे, दिपक प्रभावळकर, राहुल तपासे, सुजित आंबेकर, प्रविण जाधव, सचिन जाधव, ओंकार कदम, अमित वाघमारे, विठ्ठल हेंद्रे, संतोष नलवडे, किरण मोहिते, प्रतीक भद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार यांनी अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.