अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांवरील बहिष्कार मागे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नंदीवाले, काशीकापडी आणि तीरामले समाजाने नुकताच अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांच्या वर गेल्या अनेक वर्षाच्या पासून सुरु असलेला सामाजिक बहिष्कार मागे घेतल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समियतीचे शंकर कणसे, हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार तसेच प्रा. डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.

अंनिस ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नंदीवाले, काशीकापडी, तीरमाले समाजातील जातपंचायती मार्फत गेल्या अनेक दशकांच्या पासून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जात असे. ह्या जोडप्यांना समाजातील कोणत्याही कार्यक्रमाला जाणीवपूर्वक टाळले जायचे तसेच अनेक ठिकाणी त्या जोडप्यांना त्यांच्या कुटुंबातील लग्न, अंत्यविधी अशा कार्यक्रमाना देखील सहभागी होऊ दिले जायचे नाही.महाराष्ट्रात सगळी मिळून अशी अडीचशे जोडपी सामाजिक बहिष्कृत तेचे जगणे जगात होती ह्या ऐतिहासिक निर्णयाच्या मुळे त्या जोडप्यांना आता समाजात सन्मानाने जगता येवू शकेल अशी अशा निर्माण झाली आहे असे देखील पत्रकातनमूद केले आहे.

सातारा येथील मेढा गावातील अशाच एक प्रकरणात सातारा पोलीस आणि महाराष्ट्र अंनिस ह्यांच्या पुढाकाराने बहिष्कार मागे घेण्यात आला होता . सामाजिक बहिष्कार विरोधी कायदया अंतर्गत सामाजिक स्वरूपाचा गुन्हा म्हणून त्या मध्ये तडजोड करण्यात आली होती . त्या वेळी नंदीवाले, काशी कापडी आणि तीर माले समाजातील जात पंचानी समजतील सर्वाशी सल्लामसलत करून बाकीच्या सर्व आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना वरील बहिष्कार उठवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या नुसार महाराष्ट्र अनिस चे प्रतिनिधी आणि समाजाचे प्रतिनिधी ह्यांच्या मध्ये अनेक वेळा संवादाच्या बैठका झाल्या. त्या मधून प्रेरणा घेवून नुकतीच कराड येथे ह्या तिन्ही समाजातील पंचांची आणि सबंधित जोडप्यांची बैठक झाली त्या मध्ये सर्वाची मते विचारात घेवून आंतरजातीय विवाहांना आता. कायद्याने पाठबळ आहे आणि लोकांचे व्यक्‍ती स्वतंत्र हा मुद्दा लक्षात घेवून तसेच सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक निर्णय बहुमताने घेण्यात आला असे अध्यक्षीय भाषणात वसंतराव देशमुख ह्यांनी जाहीर केले. त्याला समजतील विविध जिल्ह्यातील पंच उपस्थित होते. ह्या पुढे आंतरजातीय लग्न करणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत केले जाणार नाही तसेच त्यांच्या कडून दंड घेतला जाणार नाही असा देखील निर्णय घेतला गेला.आंतरजातीय विवाह केल्याने बहिष्कृत जोडप्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे.अजून काही पंच हे कायदा विरोधी भूमिका घेत असल्यास त्या विरोधी महाष्ट्रातविविध ठिकाणी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहे .असाच एक गुन्हा पलूस येथे दाखल करणार असल्याचे देखील पत्रकात नमूद केले आहे. महाराष्ट्र अनीस मार्फत दीपक माने, वंदना माने भगवान रणदिवे यांनी या साठी विशेष परिश्रम केले.

error: Content is protected !!