सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी, ता. सातारानजिक असणाऱ्या खाणीत मृतअवस`थेत सापडलेल्या अमोल डोंगरे याच्या खून प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सुनील रखमाजी डोंगरे (३३, पिंपरी चिंचवड, पुणे) व मधुकर सोमाजी सोनवणे (५१, बीड) असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडीतील खाणीत चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. सातारा शहर पोलिसांनी घटनास`थळी धाव घेऊन मृतदेह खाणीतून वर काढला. त्याच्या हातावर राणी असे गोंदले होते. मात्र, तरी सुद्धा त्या युवकाची ओळख पटली नव्हती. सरतेशेवटी पोलिसांनी सातारा जिल्ह्यात व परजिल्ह्यात मिसिंग व्यक्तींची माहिती घेण्यास सुरूवात केल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह अमोल डोंगरेचा असून तो बेपत्ता असल्याबाबत सिंहगड पुणे पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांना तपास करण सोपं झालं. अमोल डोंगरे याचा खून कोणी व कशासाठी केला, याचाही पोलिसांनी तपास केला असता पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत.
सुनील रखमाजी डोंगरे (३३, पिंपरी चिंचवड, पुणे) व मधुकर सोमाजी सोनवणे (५१, बीड) या दोघांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरक्षक समीर कदम, उस्मान शेख, पो. ना. सुजित भोसले, पंकज ढाने, अविनाश चव्हाण यांनी सहभाग घेतला.
You must be logged in to post a comment.