सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव येथील श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेत ३० कोटी ७८ हजार ४७ हजार ३०६ रुपयांचा अपहार करून सन २०१९ पासून बेपत्ता असलेल्या ताजुद्दीन हसन इनामदार रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, लक्ष्मण रामचंद्र शिंदे रा. आसगाव, ता. कोरेगाव या दोघांना सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २०१९ साली कोरेगाव येथील श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व इतर संचालक मंडळाविरोधात ३० कोटी ७८ लाख ४७ हजार ३०६ रुपयांचा अपहार करून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत होते मात्र ते मिळून येत नव्हते. दि. २६ ऑगस्ट रोजी हे दोघेही कोरेगाव येथे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद नलावडे आणि पोलीस नाईक मनोज जाधव यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावला असता त्यामध्ये दोघेही अलगद अडकले. त्यांच्याकडे चौकशी केली असता अपहार प्रकरणात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली
You must be logged in to post a comment.