सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील अॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडली. या मारहाणीत त्यांचा एक डोळा निकामी झाला. असून मारहाण करण्यात आलेल्या युवकांच्या टोळीतील नावे समोर आली आहेत. शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
वकील राममोहन खारकर हे एम एच ११ डीके ००१६ या कारमधून घरी निघाले होते. मोनार्क हॉटेलपासून पुढे एका चढणाच्या जवळ ५ ते ६ तरुण थांबले होते. संबंधितांना ‘रस्त्यावरून बाजूला व्हा’, असे म्हटल्यानंतर त्या तरुणांनी खारकर यांच्यासोबत वाद घातला व त्यांच्या अंगावर धावून गेले. संशयितांनी हल्ला चढवत कारच्या काचा फोडल्या. यात खारकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांची पथके रवाना झाली. शाहूपुरी पोलिसांनी प्रतिक कांबळे आणि सातारा शहर पोलिसांनी आकाश देवानंद यांना अटक केली. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
You must be logged in to post a comment.