सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण तालुक्यातील बावीस वर्षीय विवाहितेच्या मुलाला जीव मारण्याची धमकी देऊन दोघा भावांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना खळबळ उडाली आहे.
या दोन सख्या भावंडांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
२०१९ मध्ये पीडित विवाहितेचा २१ वर्षेीय युवक वारंवार पाठलाग करत होता. पीडित महिला शेतात जात असताना संबंधित २१ वर्षाच्या युवकाने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतरही तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केला. तसेच, या युवकाचा २० वर्षाचा धाकटा भाऊ सुद्धा पीडितेला मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचे पीडित विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.