सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाचवड (ता.खटाव) येथील यात्रेनिमित्त आयोजीत केलेल्या बैलगाड्याने शर्यतीत आखलेला फाटी ( ट्रक) पुर्ण केल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर बैलगागाडा विहिरीत पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पाचवड (ता.खटाव) येथील जोतीबा यात्रेनिमित्त प्रशासनाकडून रितसर परवानगी घेवून बैलगाड्याच्या शर्यतीचे आयोजन केले होते. त्यानुसार आज बैलगाड्या शर्यत सुरु होत्या. सुमारे चार वाजता एक बैलगाड्याने शर्यतीचा ट्रक पुर्ण केल्यानंतर बैलगाडा पुढे गेला. त्यात चालक खाली पडून त्याचा बैलावरील ताबा सुटला. त्यानंतर बैलगाडा सैरावैरा धावत विखळे हद्दीतील औतडवाडीतील विहिरीत पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्य झाला. त्यानंतर सबंधीत मालकाने बैलांना वर काढीत बैलगाडा ताब्यात घेतला.
You must be logged in to post a comment.