कवठे परिसरात एका रात्रीत दोन घरफोड्या

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे बेंगलोर महामार्गालगत असलेल्या कवठे ता. वाई येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी घरफोड्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोरांनी पोबारा केला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,मंगळवारी रात्री १:३० वाजणेच्या सुमारास मर्ढेकर माळावर चोरांनी प्रथम घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तीवरील ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोरांनी तेथून कवठे गावाकडे पोबारा केला. यानंतर रामचंद्र कुडाळकर यांच्या घराची आतून घातलेली कडी चोरांनी उघडून घरामध्ये प्रवेश केला व कपाटातील ठेवलेल्या वस्तू  घराच्या पडवीत आणून १० तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून पुन्हा बापू संभाजी ससाणे यांच्या घराच्या मागील दाराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करून पर्समधील सोन्याची अंगठी लंपास करण्यात चोर यशस्वी झाले. त्यानंतर मुरलीधर पोळ यांच्या घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल चोरांनी चोरली . याच दरम्यान रामचंद्र कुडाळकर यांच्या लक्षात चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातडीने ग्रामस्थांना याबाबत जागरूक केले. ग्रामस्थांनी तातडीने गावातील भोंगा वाजवल्याने ग्रामस्थ सतर्क होवून समाजमंदिरासमोर यायला सुरुवात झाल्याने चोरांनी चोरी केलेली मोटारसायकल शेतात टाकून घटनासथळावरून पोबारा केला. 

error: Content is protected !!