सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अतरावर असलेल्या नाकिंदा ते क्षेत्र महाबळेश्वरला जोडणाऱ्या डचेस रस्त्यालगत जंगलात दोन गव्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
नाकिदा ते क्षेत्र महाबळेश्वरला जोडणाऱ्या डचेस रस्त्यालगत जंगलात दोन गव्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. एक रानगवा हा ओढ्यात तर दुसरा रानगवा हा जंगलामधील पाऊलवाटेनजीक झाडांच्या वेलीत आढळून आला.मृत झालेल्यांत एक नर तर एक मादी रानगवा असून अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
या दोन्ही रान गवव्याचे वजन अंदाजे दोन टन असल्याचे बोलले जात आहे. या रानगव्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन शुक्रवारी करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
You must be logged in to post a comment.