सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड शहरात बनावट एटीएम कार्डव्दारे नागरीकांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून लुबाडणाऱ्या दोन परेदशी नागरीकांना पोलिसांनी रंगेहात आज येथे अटक केली.
क्लोनव्दारे तयार केलले ७५ बनावट एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यातील ७१ कार्ड चालू स्थितीत आहेत. त्या कार्डवर तब्बल ३५ लाखांची रक्कम शिल्लक आहे. ती काढण्यापूर्वी मलकापूरातून दोघांना पोलिसांनी अटक केली. इस्फॅन लुस्टीन जुओर्गल (वय २९) व लुनेट व्हसइल गॅबरिअल (२८ दोघे रा. रूमानीया) असी त्यांची नावे आहेत. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
कराड शहरात पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चपळाईने केलेल्या कामगिरीने दोन भामट्या परदेशी नागरीकांना अटक झाली आहे. पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षक अमीत बाबर व त्यांच्या पथकाने कारवाई केली.
You must be logged in to post a comment.