सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील लोणंद व उंब्रज पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद असणाऱ्या दोन टोळीतील सहाजणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपारीचा आदेश काढला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोणंद पोलीस ठाण्यात खून, दुखापत करुन दरोडा टाकणे, जबरी चोरी, पेट्रोल चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे आदी गुन्हे एका टोळीविरोधात नोंद होते.
या टोळीचा प्रमुख राकेश उर्फ सोन्या भगवान भंडलकर (वय २१, रा. तांबवे, ता. फलटण), टोळी सदस्य सौरभ संजय जगताप (वय २१, रा. सालपे, ता. फलटण) या दोघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि लगतच्या पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व भोर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.