सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील रहदारी असणाऱ्या पोवई नाका परिसरात शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बँकेत भरणा करण्यासाठी पैसे घेऊन जाणाऱ्या युवकाला दांडक्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये जवळपास दोन लाखाहून अधिक रक्कम लंपास झाली आहे.
या मारहाणीत चार ते पाच जणांचा समावेश असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. तसेच नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सातारा शहरात भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक आँचल दलाल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी भेट देऊन तपासाची सूचना केली आहे.
You must be logged in to post a comment.