सातारा : कृष्णानगर परिसरात मंगळवारी रात्री कॅनाॅलच्या भिंतीवर डोके आपटल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे संबंधित दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते. त्याचा हेल्मेटचा चक्काचूर झाला.
संदीप आनंदराव सुतार (वय ४२, रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संदीप सुतारे हे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी त्यांनी डोक्यात हेल्मेट घातले होते. शहरालगत असलेल्या कृष्णानगर येथे ते आल्यानंतर अंदाज न आल्याने कण्हेर डाव्या कालव्यात ते दुचाकीसह कोसळले. यावेळी कॅनाॅलच्या भिंतीला त्यांचे डोके जोरदार आपटले. यामध्ये हेल्मेट फुटून बाजूला पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला.
You must be logged in to post a comment.