सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महामार्गावर वळसे गावाच्या नजीक दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गोळेवाडी येथील ऋषिकेश गोळे याचा जागीच मृत्यू झाला असून जावळी येथील अविनाश गोळे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजताच्या सुमारास उंब्रज येथे आयटीआयची परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरून दोन तरुण निघाले होते. यावेळी झालेल्या अपघातात ऋषिकेश चंद्रकांत गोळे याचा अपघातामध्ये झाला. या घटनेनं गोळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
You must be logged in to post a comment.