मायणीत ट्रकच्या धडकेत दुचाकी चालक ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मायणी, ता. खटाव येथील चांदणी चौकात गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ट्रक व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यात दुचाकी चालक दादासो पांडुरंग शिंदे (६५, रा. मोराळे, ता. खटाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज भिगवण राज्य मार्गाचा मायणी येथे छेद (चांदणी चौका) तयार झाला आहे. या छेदावर पंढरपूर बाजूने उंब्रज (पुणे बेंगलोर आशिया मार्ग) निघालेला ट्रकने (एम.एच २६ बी.ई.९९२१) दादासो शिंदे यांच्या मोटरसायकलला (टी एन ६६ ए.एफ.११८३) धडक दिली. यामध्ये हे १० ते १२ फूट घसरत गेले.यावेळी ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

error: Content is protected !!