सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका येथे रविवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या दरम्यान कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर चालक गंभीर जखमी झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दुचाकी चालक मधुकर गोविंद पटवर्धन (वय ७२) व विद्या पटवर्धन (वय ६५) रा. सांगली हे दुचाकी क्र. एम एच १० डीएच ३७०८ वरून पुणेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनर क्र. एन एल ०१ क्यू ६७९४ ने दुचाकीस विरमाडे गावच्या हद्दीत मागून धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील विद्या पटवर्धन या कंटेनरसोबत सुमारे २० मीटर अंतरावर महामार्गावरून फरफटत गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.
दरम्यान, अपघताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.