सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई एमआयडीसीमधील दोन कामगार धोम डाव्या कालव्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश धर्मदासजी (वय २०) व बिरु श्रीपाल ( २१, दोघे रा. सुल्तानपुरी नॉर्थ वेस्ट, दिल्ली) अशी मृतांची नावे आहेत.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई एमआयडीसी मध्ये यश इंडस्ट्रीजमध्ये नरेश धर्मदासजी (वय २०, रा. सुल्तानपुरी नॉर्थ वेस्ट, दिल्ली) व बिरु श्रीपाल असे दोघेजण कामाला होते पण इंडस्ट्रीज मध्ये नेमून दिलेले काम पसंत नसल्याने ते दोघेही दि.६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावरुन कंपनीच्या बाहेर निघून गेले होते. दुपारी ते दोघे धोम डाव्या कालव्यात अंघोळ करण्यासाठी गेले असता पाण्याचा वेग जास्त होते. त्याचा त्यांना अंदाज न आल्याने ते दोघेही वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. नरेश याचा मृतदेह रविवार पेठ, मोती बाग येथील धोम डाव्या कालव्यात तर त्याचा मित्र बिरु श्रीपाल याचा भिरडाचीवाडी येथे मृतदेह सापडला.
You must be logged in to post a comment.