वाईजवळ अपघातात दोन युवक ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : यशवंनगर, वाईच्या हद्दीत, इनामदार गॅरेज जवळ डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातामध्ये दोन युवक ठार झाले. याबाबतची फिर्याद संकेत संतोष चव्हाण राहणार ओझर्डे यांनी वाई पोलिस ठाण्यात  दिली आहे

 वाई पोलीस स्टेशन मधून  मिळालेली माहिती अशी की रविवार दिनांक 23 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातामध्ये दोन युवक ठार झाले. दुचाकी क्रमांक (एम एच 11 बीसी 99 49 ) वरून अनिकेत संतोष चव्हाण (वय  20 रा. ओझर्डे, ता. वाई) व राम सदानंद महागडे  (वय 20, रा. सर्कलवाडी, ता. कोरेगाव) हे दुचाकीवरून वाईहून पाचवड च्या दिशेने जात असताना पाचवड वरून वाईच्या  दिशेने येणारा डंपर क्रमांक( एम एच 11 ए एल 82 71) याने ठोकर दिल्याने अनिकेत संतोष चव्हाण व राम सदानंद महांगडे हे दोन युवक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास वाई  पोलीस करीत आहेत 

error: Content is protected !!